Pune : धक्कादायक! शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार; समुपदेशनातून फुटली चार वर्षांपूर्वीच्या घटनेला वाचा
एमपीसी न्यूज : पुणे शहरातील कोंढवा परिसरातून (Pune) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाळेत सुरू असलेल्या समुपदेशन कार्यक्रमातून तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याचे उघडकिस आले आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 वर्षीय पीडित मुलीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. हा प्रकार घडला तेव्हा पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिकत होती.
मुन्ना नदाफ याच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2018 ते 2019 दरम्यान घडला आहे. आरोपींविरोधात भादवी 376 376 ड 376 ड ब 376 अ ब 342 सह पोक्सो ऍक्ट कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आता दहावीच्या वर्गात शिक्षण घेते. तिच्या शाळेत समुपदेशनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमादरम्यान शाळेतील महिला शिक्षिका विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना पीडित मुलीने ही आपबिती त्यांना सांगितली. आरोपी आणि पीडिता हे एकाच परिसरात राहण्यासाठी आहे. एकमेकांच्या परिचयाची देखील आहेत. 2018 ते 2019 या कालावधीत पिढीचा सहावी किंवा सातवीत असताना घराशेजारील गल्लीत खेळत होती.
Pune : पुणे जिल्हा परिषदेला भारतीय लोक प्रशासन संस्थेचा स्व. एस. एस. गडकरी पुरस्कार
यावेळी एका घराच्या खिडकीतून काहीतरी वस्तू खाली पडली होती. पडलेली वस्तू देण्यासाठी फिर्यादी घरात गेल्या असता घरात असणाऱ्या आरोपींनी पीडित तरुणीला घरात ओढून घेऊन आतून कडी लावून घेतली. त्यानंतर या मुलीचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून मोठ्या आवाजात म्युझिक लावून तिच्यावर तीनही (Pune) आरोपींनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला.
या संपूर्ण कृत्याविषयी कुणाला काही सांगितल्यास तुझे व घरच्यांचे हाल करेल अशी धमकी दिली. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली आहे. इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे.