Nigdi: प्राधिकरण निगडी येथे सामुदायिक व्रतबंध सोहळा

एमपीसी न्यूज – हिंदू संस्कृतीमध्ये सोळा संस्कारांपैकी एक महत्त्वाचा समजला(Nigdi) जाणारा  व्रतबंध संस्कार अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड शहरा तर्फे काल  (1 मे ) रोजी खानदेश मराठा मित्र मंडळ,प्राधिकरण येथे पार पडला.

 

सुरुवातीला महासंघाच्या वतीने सर्व बटूंचे औक्षण करून रांगोळी व फुलांच्या पायघड्या घालून स्वागत करण्यात  (Nigdi)आले.त्यानंतर मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली.11 वाजून 23 मि शुभमुहूर्तावर हा मुंज सोहळा पार पडला.अतिशय देखणे रुखवत या प्रसंगी मांडण्यात आले होते.

 

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रबोधन मंचातर्फे.संतोष गायकवाड आणि सहकारी यांनी सर्वांना मतदानाच्या दिवशी आवर्जून मतदान करावे असे आवाहन करण्यात आले>महासंघातर्फे वेळोवेळी ब्राह्मण आणि इतर समजासासाठी उपयुक्त असे कार्यक्रम आयोजित केले जातात.त्याच अंतर्गत या वर्षापासून दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा महासंघाचा मानस आहे असे महासंघाचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी सांगितले.

 

Maval LokSabha Elections 2024 : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी वाघेरे यांच्या प्रचारात सक्रिय

 

महासंघाचे सरचिटणीस. आनंद देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी बटूंना शुभाशिर्वाद देण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप,आमदार उमा खापरे,भाजप युवामोर्चा प्रदेश सरचिटणीस  अनुप मोरे, माजी नगरसेविका .शैलजा मोरे,माजी नगरसेविका  अश्विनी  चिंचवडे, माजी नगरसेवक .सुरेश भोईर, राजू गोलांडे,.आर.एस.कुमार, युवा उद्योजक प्रताप बारणे, भाजप मंडल अध्यक्ष राजेंद्र बाबर,.तेजस्विनी कदम,सलीम शिकलगार हे  उपस्थित होते.

 

 

तसेच ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष .गोविंद,कुलकर्णी,प्रदेश कार्याध्यक्ष .निखिल  लातूरकर,प्रदेश उपाध्यक्ष पुष्कराज गोवर्धन,प्रदेश सरचिटणीस दिलीप कुलकर्णी,प्रदेश ब्रम्होद्योग उपाध्यक्ष .राजनजी बुडूख,प्रदेश सचिव .संजय परळीकर,पुणे शहराध्यक्ष .मंदार रेडे,पुणे शहर महिला अध्यक्ष.केतकी कुलकर्णी हे महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

तसेच हा आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिंपरी चिंचवड अध्यक्ष सचिन कुलकर्णी,कार्याध्यक्ष महेश बारसावडे,शहर सरचिटणीस आनंद देशमुख,.मुकुंद कुलकर्णी,सरचिटणीस राहुल कुलकर्णी,शहर उपाध्यक्ष .अतुल इनामदार व भाऊ कुलकर्णी.प्रशांत कुलकर्णी,.अभय कुलकर्णी,.मकरंद कुलकर्णी,.वैभव खरे,. अजित देशपांडे,शहर महिला अध्यक्ष.सुषमा वैद्य,संध्या कुलकर्णी, वैशाली कुलकर्णी,.धनश्री देशमुख,.साक्षी जोशी.कविता बारसावडे,.अपर्णा खरे,आरती खोसे, अनिता कुलकर्णी,.संगीता कुलकर्णी,संपदा गुपचूप,.नेहा साठे,मधुवंती वखरे,.ऋजुता कुलकर्णी,.पूर्वा बारसावडे व सर्व कार्यकारणी सदस्य यांनी गेली 1 ते 1.5 महिना अतिशय मेहनत घेवुन हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला.

 

 

या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून खासदार श्रीरंग बारणे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश बारसावडे यांनी केले तर आभार प्रदर्शन आनंद देशमुख यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.