New Delhi : अटलबिहारी वाजपेयी यांचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल

अंतिम दर्शनासाठी उसळला जनसागर

एमपीसी न्यूज- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे पार्थिव नवी दिल्लीमधील भाजपच्या मुख्यालयात दाखल झाले असून त्यांच्या अंतिम दर्शनासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते, पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. अटलजींच्या आठवणीने संपूर्ण परिसर भावुक झाला आहे. या ठिकाणी दुपारी एक वाजेपर्यंत पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. वाजपेयी यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने 22 ऑगस्टपर्यंत सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून, त्यांच्या पार्थिवावर आज, शुक्रवारी दुपारी चार वाजता दिल्लीतील राष्ट्रीय स्मृतीस्थळ येथे संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.