Pimpri : पर्यावरणपूरक गणपती बनविण्याची कार्यशाळा

इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड आणि पालक महासंघ सखी गटाचा उपक्रम

एमपीसी न्यूज  – इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड आणि पालक महासंघ सखी गट यांच्या वतीने कोणत्याही साचाशिवाय पर्यावरणपूरक गणपती बनविण्याची दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा मंगळवार (दि. 21) आणि बुधवार (दि. 22) रोजी निगडी येथे होणार आहे.

निगडी मधील प्लॉट नंबर 184, सेक्टर नंबर 25, अप्पूघर रोडवर ही दोन दिवसीय कार्यशाळा दुपारी 3 ते 6 या वेळेत होणार आहे. प्रवेश संख्या मर्यादित आहे. सहभागी उमेदवारांना आयोजकांकडून सर्व साहित्य देण्यात येणार आहे. सहभागासाठी माफक शुल्क ठेवण्यात आले आहे.

पुढील महिन्यात गणपती बाप्पांचे वाजत गाजत स्वागत होणार आहे. बाप्पाच्या आगमनाची तयारी सर्व स्तरावर अंतिम टप्प्यात आली आहे. परंतु गणपती बाप्पांची मूर्ती शाडूच्या मातीने ती सुद्धा कोणत्याही साचाशिवाय बनविली तर आपला आनंद द्विगुणित होईल. घरचा गणपती बनविण्याबरोबरच आसपासचे नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना देखील याचे प्रशिक्षण मिळायला हवे. एकाच कार्यशाळेत सर्वांना प्रशिक्षण देणे केवळ अशक्य असल्याने या कार्यशाळेत प्रशिक्षक तयार करण्याचा मुख्य उद्देश ठेऊन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात प्रशिक्षण घेतल्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या वतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी अनघा देशपांडे (9326931781/8390458155) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.