Talegaon Dabhade News : ‘विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ’ विषयावर कार्यशाळा संपन्न

एमपीसी न्यूज – नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे व न्यू समर्थ स्मार्ट स्कूलिंग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक बाबी नमूद करत शिक्षक आणि पालकांची भूमिका या कार्यशाळेत विशद करण्यात आली.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे व न्यू समर्थ स्मार्ट स्कूलिंग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण उपसंचालक दीपक चवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. न्यू समर्थ स्मार्ट स्कूल पुण्याच्या कार्यकारी संचालक संजय देशमुख सुरेश पांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी संस्थेचे सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के, संस्थेचे ज्येष्ठ संचालक यादवेंद्र खळदे,सोनबा गोपाळे,दामोदर शिंदे, महेशभाई शहा हे उपस्थित होते.

याप्रसंगी दीपक चवने यांनी आपल्या मनोगतात पुरोगामी महाराष्ट्र संस्कृती यांना बुध्दीची जोड हवी त्यातून कार्ये अधिक प्रभावी होते असे सांगितले.

संजय देशमुख यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना यांनी आपल्या करिअरसाठी प्लॅन तयार असावेत व विद्यार्थ्यांना शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन करावे हेही नमूद केले पालकांनीही आपल्या मुलांसाठी वेळ दिला पाहिजे हे त्यांनी आवर्जून सांगितले.

सुरेश पांडे सर यांनी शिक्षक हा शाळेचा आत्मा असतो, विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण दिले पाहिजे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संतोष खांडगे यांनी केले. आभार नंदकुमार शेलार यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभा काळे, पांडुरंग पोटे यांनी केले. याप्रसंगी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.