Pimpri : चिखली पोलीस ठाण्याला घटस्थापनेचा मुहूर्त

आठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

एमपीसी न्यूज – चिखली पोलीस ठाणे सुरू करण्यासाठी घटस्थापनेचा मुहूर्त काढण्यात आला आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते बुधवारी (दि. 10) चिखली पोलीस ठाण्याचे उदघाटन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 8) आठ पोलीस अधिकाऱ्यांच्या चिखली पोलीस ठाण्यात नियुक्त्या करण्यात आल्या. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी सोमवारी काढले.

नुकत्याच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 15 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून विवेक मुगळीकर यांची नियुक्ती करण्यात आली. तर पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे यांची नियुक्ती करण्यात आली. शनिवारी (दि. 6) चिखली पोलीस ठाण्यासाठी 100 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चिखली पोलीस ठाण्यात नियुक्त करण्यात आलेले अधिकारी –

पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे (निगडी पोलीस स्टेशन ते चिखली पोलीस स्टेशन)
सहायक पोलीस निरीक्षक सतीश सुरेश कांबळे (पिंपरी पोलीस स्टेशन ते चिखली पोलीस स्टेशन)
सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश जगन्नाथ जगदाळे (निगडी पोलीस स्टेशन ते चिखली पोलीस स्टेशन)
पोलीस उपनिरीक्षक संदीप अशोक बागुल (निगडी पोलीस स्टेशन ते चिखली पोलीस स्टेशन)
पोलीस उपनिरीक्षक योगेश भास्कर शिंदे (निगडी पोलीस स्टेशन ते चिखली पोलीस स्टेशन)
पोलीस उपनिरीक्षक भरत विठ्ठलराव चपाईतकर (पिंपरी पोलीस स्टेशन ते चिखली पोलीस स्टेशन)
महिला पोलीस उपनिरीक्षक रत्नमाला त्र्यंबकराव सावंत (एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन ते चिखली पोलीस स्टेशन)
पोलीस उपनिरीक्षक मधुसुदन आर. घुगे (पिंपरी पोलीस स्टेशन ते चिखली पोलीस स्टेशन)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.