Chinchwad : कोयता बाळगणारा गजाआड
एमपीसी न्यूज – लोखंडी कोयता बाळगणाऱ्याला चिंचवड पोलिसांनी पिंपरी लिंक रोड येथून अटक केली आहे.
आकाश ऊर्फ कपाळ्या राजू काळे (वय-28, रा. पत्राशेड झोपडपट्टी, लिंक रोड, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस नाईक राजेंद्र शिरसाट यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलिस तपास करत आहेत.