Pune : पूर्वा ढेरे हिला ‘श्नायडर इलेक्ट्रिक ‘ची वार्षिक 50 हजार रुपयांची शिष्यवृत्ती

एमपीसी न्यूज- भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी पूर्वा ढेरेला ‘श्नायडर इलेक्ट्रिक’ ची वार्षिक 50 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे.

भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी ही माहिती दिली. पूर्वा ढेरे ही या महाविद्यालयाच्या इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे .प्राचार्य डॉ. आनंद भालेराव आणि इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग विभागाचे प्रमुख दीपक बनकर यांनी तिचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.