Chikhali : कपड्याचे दुकान फोडून 55 हजारांचे कपडे चोरीला

एमपीसी न्यूज – कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानातून 55 हजार रुपये किमतीचे कपडे चोरून नेले. ही घटना म्हेत्रेवस्ती चिखली येथे मंगळवारी (दि. 5) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली.

सुनील बिभीषण भगत (वय 28, रा. म्हेत्रेवस्ती, चिखली. मूळ रा. कोराळ, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील यांचे टॉवर लाईन म्हेत्रेवस्ती, चिखली येथे श्रीराम सोसायटी जवळ भाग्यवंती कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दुकान कुलूप लावून बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून, लॉक तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातून 55 हजार रुपये किमतीचा गारमेंट माल चोरून नेला. मंगळवारी सकाळी सुनील दुकान उघडण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.