Indori : माजी विद्यार्थ्यांनी 22 वर्षांनी पुन्हा घेतला शाळेचा आनंद !

इंदोरीच्या प्रगती विद्या मंदिरमध्ये भरला 1995 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

एमपीसी न्यूज- शाळेतील वर्ग….. जुने सवंगडी….. त्यांच्यामधील हास्यविनोद यांचा आनंद माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा अनुभवला. निमित्त होते प्रगती विद्या मंदिरमध्ये नुकताच 1995-96 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होते.

माळवाडी येथील मावळ ग्रॅन्ड ओशन स्पाईस या हॉटेलच्या हॉलमध्ये या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. तब्बल 22 वर्षांनी सर्वजण एकत्र आल्यामुळे सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. प्रगती विद्या मंदिराचे त्या बॅचच्या शिक्षकवर्ग सुदाम वाळुंज, मालती वाळुंज, लीलावती साळुंखे, वासंती काळोखे, कैलास पारधी, चंद्रसेन बनसोडे यांचा सत्कार तुकाराम गाथा व शाल व श्रीफळ गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.

नवनिर्वाचित उपजिल्हाधिकारी स्वाती किसन दाभाडे यांचाही सत्कार करण्यात आला. सर्व मिञ मैत्रिणींनी विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या 22 वर्षाच्या जुन्या आठवणीना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सर्व गुरुजनांनी सुद्धा विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

या सर्व सवंगड्याना एकत्र आणण्याचे काम माजी विद्यार्थी महेंद्र जायगुडे, प्रदीप शिंदे, सचिन दाभाडे, महेश राऊत, संदीप ढोरे, विद्या काशिद, रेखा शिनगारे, संपदा गव्हाणे यांनी केले. या सर्व माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी संकलित केलेल्या निधीतून अनाथ आश्रमाला देणगी व शाळेला वॉटर फिल्टर भेट देण्यात आला .

प्रास्ताविक दिनेश चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन अलका आडकर यांनी तर आभार वसंत भसे यांनी मानले. अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.