Bhosari : कर्जाच्या आमिषाने 19 महिलांची फसवणूक

एमपीसी न्यूज- पतसंस्थेतून कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने तब्बल 19 महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी शनिवारी (दि.13) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अनुसया रामा बाबरे (वय 46  रा.लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार उमेश वासुदेव वाघमारे (वय 38 रा.वल्लभनगर पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी याने वल्लभनगर येथील भारतीय महिला नागरी सहकारी पतसंस्थेत ओळख असल्याचे सांगत महिलांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार प्रत्येक महिलेकडून 1050 रुपये मागितले. अशा प्रकारे 19 महिलांकडून पैसे घेतले. त्यानंतर त्यांना कर्ज मिळवून न देता पैशांचा अपहार केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. त्यानंतर आरोपी पसार झाला असून एमआयडीसी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.