Hinjawadi : बाणेरमधून दीडशे किलो गांजा जप्त

अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – बाणेर येथे उभ्या असलेल्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 35 लाख 88 हजारांचा दीडशे किलो गांजा हस्तगत केला. अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.

योगेश दत्तात्रय जोध (वय 28), सागर दिगंबर कदम (वय 28, दोघेही रा. डी.मार्ट जवळ, जुळे सोलापूर, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पौळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथक बुधवारी (दि.1) बाणेर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस हवालदार राजन महाडीक यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी योगेश व सागर या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दीडशे किलो वजनाचा 35 लाख 88 हजारांचा गांजा हस्तगत केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे, पोलीस कर्मचारी प्रशांत महाले, कर्मचारी राजन महाडीक, राजेंद्र बांबळे, प्रदीप शेलार, दिनकर भुजबळ, संतोष दिघे, दादा धस, प्रसाद जंगीलवाड, अशोक गारगोटे, शैलेश मगर, प्रदीप गट्टे, अनिता यादव यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.