Pimpri: कुंदन गायकवाड यांना महापालिका देणार सहा महिन्याचे मानधन

एमपीसी न्यूज – अनुसचित जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द केल्याने रद्द केलेले नगरसेवकपद पुन्हा मिळाल्यानंतर भाजप नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी सहा महिन्यानंतर सोमवारी (दि.20)झालेल्या महापालिका सभेला हजेरी लावली.  त्यांना सहा महिन्याचे 15 हजार रुपये मानधन द्यावे लागणार आहे.  सहा महिन्यांचे एकूण 90 हजार रुपये थकीत मानधन महापालिका गायकवाड यांना देणार आहे.

कुंदन गायकवाड यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बुलढाणा जात पडताळणी प्रमाणपत्र समितीने अवैध ठरविले होते. तसेच त्यांना अनुसूचित जातीचे दिलेले फायदे तत्काळ काढून घेण्याचे आदेशही दिले होते. त्यानुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गायकवाड यांचे पद रद्द केले होते. याविरोधात त्यांनी पुन्हा समितीकडे दावा दाखल केला होता. त्यानंतर त्यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र या समितीने वैध ठरविले होते. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या गायकवाड यांना पुन्हा नगरसेवकपद बहाल करण्यात आले.

नगरसेवक पद रद्द झाल्याने ऑक्‍टोबर 2018 ते मार्च 2019 या कालावधीत कुंदन गायकवाड यांना महापालिकेच्या एकून सहा सर्वसाधारण सभांना उपस्थित राहता आले नाही. नगरसेवक पद पुन्हा मिळाल्याने त्यांनी सर्वसाधारण सभेला उपस्थिती लावली. त्यामुळे त्यांना 15 हजार रुपये मानधन द्यावे लागणार आहे. सहा महिन्यांचे एकूण 90 हजार रुपये थकीत मानधन महापालिका त्यांना देणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.