Moshi : घरासमोर पार्क केलेली कार चोरीला

एमपीसी न्यूज – घराजळील सार्वजनिक रस्त्यावर पार्क केलेली कार चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना मोशी प्राधिकरण येथे मंगळवारी (दि. 25) सकाळी उघडकीस आली.

चिराग ईश्‍वरभाई पटेल (वय 36, रा. श्रीकृष्ण पॅरेडाईज, जल वायू विहार जवळ, मोशी प्राधिकरण) यांनी शुक्रवारी (दि. 28) याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 24) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास पटेल यांनी आपली एम एच 14 / डी एन 1993 ही चार लाख रुपये किंमतीची कार राहत्या घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास त्यांनाकार चोरीस गेल्याचे दिसून आले. या कारमध्ये पटेल यांची महत्वाची कागदपत्रे होती. त्यासह कार चोरून नेली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.