Pune News : बेकायदेशीर वॉशिंग सेंटरची तक्रार केल्याने महिलेच्या घराची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : कॅन्टोन्मेंटच्या जागेवर बेकायदेशीररित्या सुरू असणाऱ्या वॉशिंग सेंटरची तक्रार केल्याचा राग धरून एका महिलेच्या घरावर दगडफेक करण्यात आली. लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दस्तुर मेहेर रोड कॅम्प परिसरात पाच डिसेंबर रोजी ही घटना घडली. एका 45 वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार शानवाज सलीम शेख (वय 35) याचे विरोधात लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News: महापालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी मार्व्हेल प्रमोटर आणि डेव्हलपर्सच्या लीगल ॲडव्हायझरवर गुन्हा दाखल

या प्रकरणी अधिक माहिती अशी ही, फिर्यादी यांच्या घरासमोरील कंपनीच्या जागेवर मोटार गाड्या वॉशिंग करण्याचा बेकायदेशीर उद्योग सुरू करण्यात आला होता. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी याची तक्रार कॅन्टोन्मेंट कडे केली होती. याच तक्रार अर्जाचा राग मनात धरून फिर्यादी महिलेच्या घरावर मोठमोठे दगड फेकण्यात आले. यामुळे फिर्यादी यांच्या घरातील गोदरेजचे कपाट भांड्याची लोखंडी मांडणी आणि घराच्या भिंतीचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत आरोपीकडे जाब विचारला असता त्याने आमच्याविरुद्ध तक्रार करतेस काय असे बोलू शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.