Pimpri News: आपली विचारसरणी जीवनाची स्थिती आणि दशा ठरवते – शिवानी दीदी

एमपीसी न्यूज : परिस्थिती कशीही असो, काहीही असो. परिस्थिती अधिक सामर्थ्यवान आहे की माझ्या मनाची स्थिती हे आपल्याला तपासावे लागेल. प्रत्येक परिस्थितीत शांत चित्ताने विचार करून वागले पाहिजे. जेव्हा आपले मन मजबूत असते तेव्हा आपण कोणत्याही परिस्थितीवर मात करून यशस्वी होऊ शकतो. आपण आपल्या मनाचे स्वामी आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे. आपली विचारसरणी आपल्या जीवनाची स्थिती आणि दिशा ठरवते. बाह्य आवरण आणि परिस्थितीनुसार स्वतःला घडवू नये, शांत मन जे सांगेल तेच करायला हवे. रागाच्या भरात किंवा कोणाचे बोलणे ऐकून भांडण करून कोणताही निर्णय घेऊ नये, असे अध्यात्मिक मार्गदर्शिका ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांनी शनिवारी (दि. १०) सांगितले.</strong

आमदार लक्ष्मण जगताप मित्र परिवाराच्या वतीने पिंपळेगुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयात “संकल्प से सिद्धी” या विषयावर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी माजी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका अश्विनी लक्ष्मण जगताप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी-चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल, हिंदू जनजागृती समितीचे पराग गोखले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धम्माचार्य संपर्कप्रमुख प्रकाशराव दिसले, शैलेश काळे, शैलेश जोशी, गिरीधारी मतनानी, महेश्वर मराठे, मुकुंद गुरव, संतोष गायकवाड, ब्रह्माकुमारी उर्मिला दीदी, ब्रह्माकुमारी लक्ष्मीदीदी, ब्रह्माकुमारी संगीता दीदी, ब्रह्माकुमारीमनिषा दीदी, स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे, भाजप महिला आघाडी शहराध्यक्षा उज्वला गावडे, माजी नगरसेविका माधवी राजापुरे, शारदा सोनवणे, उषा मुंढे, शोभा आदियाल, वैशाली जवळकर, सविता खुळे, निर्मला कुटे, आरती चोंधे, कल्पना जगताप, उर्मिला देवकर, शोभा जांभुळकर, पल्लवी जगताप, कावेरी जगताप, माजी नगरसेवक सागर आंगोळकर, हर्षल ढोरे, संतोष कांबळे, अंबरनाथ कांबळे, शशिकांत कदम, बाबासाहेब त्रिभुवन, सुरेश भोईर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती नाना शिवले, माजी प्रभाग स्वीकृत सदस्य महेश जगताप, गोपाल माळेकर, गणेश बँकेचे अध्यक्ष संजय जगताप, सामाजिक कार्यकर्ते माऊली जगताप, मनिष कुलकर्णी, संदिप नखाते, शेखर चिंचवडे, शशिकांत दुधारे, अमर आदियाल, सखाराम रेडेकर, बाळासाहेब देवकर, विनोद तापकीर, दिलीप तनपुरे यांच्यासह धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Pune News: महापालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी मार्व्हेल प्रमोटर आणि डेव्हलपर्सच्या लीगल ॲडव्हायझरवर गुन्हा दाखल

शिवानी दीदी म्हणाल्या, “मनुष्य एकटाच आपल्या मनाची स्थिती सुधारू शकतो. त्यासाठी व्यक्ती बदलली पाहिजे. तो बदलला नाही तर दु:खी होतो. मनाच्या स्थितीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. मन मोठे करून परिस्थिती बदलता येते. परिस्थिती अधिक सामर्थ्यवान आहे की माझ्या मनाची स्थिती आहे हे आपल्याला तपासावे लागेल. मनाच्या स्थितीने आपण बाह्य परिस्थितीवर सहज विजय मिळवू शकतो. बाह्यदृश्य काहीही असो आपण आतून मनाने खंबीर असले पाहिजे. आपल्याला सर्व काही मिळत राहते, असा विचार करू नये. आपले हात घेणारे नसून देणारे असावेत. जणू आपले हात देवाचे हात आहेत तेही फक्त देणारे.

आज जागतिक, सामाजिक, राज्य किंवा वैयक्तिक पातळीवर सर्वत्र अनिश्चिततेचे आणि भीतीचे वातावरण आहे. संपूर्ण जगावर युद्ध, महागाई, साथीचे रोग आणि उपासमारीचे काळे ढग दाटून आले आहेत. आजकाल, लहान मुलांना देखील चिंताग्रस्त झटके येतात आणि अनिश्चिततेचे वातावरण असते. लोकांना विविध प्रकारच्या मानसिक आजारांचा सामना करावा लागतो. या दुःखाच्या आणि तणावाच्या वातावरणात अध्यात्म हा एकमेव आधार आहे. ज्याद्वारे आपण आपल्या जीवनात शांतता अनुभवू शकतो.

आपल्यातून सतत वाहत असलेल्या कंपनांचा अनुभव घेऊन आपण ते बदलण्याचा प्रयत्न करतो. याद्वारे वातावरणातील वाढती नकारात्मक ऊर्जा दूर करता येते. आज प्रत्येक व्यक्ती भौतिकवादाच्या झगमगाटापासून दूर जाऊन शांती किंवा मानसिक शांतीच्या शोधात आहे आणि हा शोध आध्यात्मिक शक्तींनी संपन्न व्यक्तिमत्त्वाच्या सान्निध्यात आल्यानेच पूर्ण होऊ शकतो. आपल्या जीवनातील स्पंदने वाढवण्यासाठी फक्त सत्य आणि चित्तशुद्धीची गरज आहे. घर, कार्यालय, सर्व ठिकाणी सकारात्मकतेने कृतीशील राहण्याची वृत्ती जोपासावी. राग प्रत्येकाला येतो. ताण-तणावामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. त्यावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे.

राग करण्याऐवजी पर्याय काढण्यावर भर द्यावा. त्यासाठीच ध्यान महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण वेळीच दक्षता घेवून जीवनशैलीत बदल घडविणे आवश्यक आहे. कोण काय म्हणेल याकडे लक्ष न देता नकारात्मक विचारांना दूर ठेवा. त्यामुळे सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होईल. जीवनात सर्वच जण कुटुंबाच्या सुखासाठी परिश्रम घेतात. त्यासाठी आपले मानसिक आरोग्य चांगले राहिले पाहिजे. म्हणूनच मनाचे भरण पोषण चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.