Crime News : आंबेठाण येथे पेट्रोल पंपावरील दरोड्याचा कट फसला,दोघांना अटक

एमपीसी न्यूज – आंबेठाण येथे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीताल दोघांना चाकण पोलिसांनी अटक केली असून,त्यांचा दरोड्याचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे.ही कारवाई शनिवारी (दि.10) रात्री साडेअकराच्या सुमारास आंबेठाण येथील घाटेवस्ती येथे घडली.

यात चाकण पोलिसांनी अभिषेक उर्फ बबलु उत्तम भालेराव (वय 21 रा. शिरोली, खेड) व सुरज संजय वाडेकर (वय 21 रा.शिरोली, खेड) यांना अटक केली असून त्यांचे साथीदार निखील अशोक शिंदे (वय 20), मयुर कोंडिभाऊ गारगोटे (वय अंदाजे 20), जावेद निजाम शेख (वय 23 )सर्व राहणार शिरोली,खेड हे फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना खबर मिळाली की काही लोक घाटेवस्ती येथे दरोड्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार पोलिसांनी घाटेवस्ती येथील पेट्रोलपंपाजवळ दुचाकीवर उभे असलेल्या अभिषेक व सुरजला ताब्यात घेतले, तर बाकी तीन जण तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. या दोघांकडून पोलिसांनी लोखंडी रॉड, लोखंडी कटावणी, लोखंडी कोयता,दोन दुचाकी असा एकूण 85 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलिसांनी आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी दरोडा टाकण्यासाठी आल्याचे कबुल केले आहे.चाकण पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.