Pimpri News : 23 वी राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफल 18 सप्टेंबरला भोसरीत रंगणार

एमपीसी न्यूज – नक्षत्राचं  देणं काव्यमंच यांच्यावतीने कै. धोडींबा फुगे मैदान सभागृह येथे महाराष्टातील 23 वी राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफल व स्पर्धा पारीतोषिक वितरण आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम सकाळी 10.30 वा सुरु होणार आहे.

या सोहळ्याचे उद्घाटन विचारवंत प्रभाकर आवारी, चंद्रपूर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी, शिक्षणतज्ञ उदय सर्पे – सिंधुदुर्ग हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी उद्योजक कृष्णकुमार गोयल, आमदार महेश लांडगे, नगरसेवक अजित गव्हाणे, कामगार नेते डाॅ.कैलास कदम, अभियंता वसंत टाकळे – रत्नागिरी, अॅड.नितीन लांडगे, उद्योजक विजय फुगे, अमर फुगे, सुखदेव सोनवणे, उद्योजक योगेश आमले, नितीनशेठ लोणारी, सचिन चिखले, किरण मोरे इ. अनेक मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा होणार आहे.

यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील आलेल्या कवी कवयित्रींची बहारदार कवितांनी श्रावणी काव्यमैफल रंगणार आहे. या वेळी महाराष्ट्रातील मानाची समजली जाणा-या श्रावणी काव्यलेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे. साहित्य सेवा करणा-या दिवाळी अंक स्पर्धेचे बक्षिस वितरण होणार आहे. समाजसेवक सावळेराम रखमाजी डबडे कविरत्न पुरस्कार कवी रामचंद्र पंडित ,सातारा यांना प्रदान करण्यात येणार आहे.तसेच कवितेची व साहित्याची सेवा करणा-या कट्टर नक्षत्रांना नक्षत्र गौरव पुरस्कार संपुर्ण महाष्ट्रातून निवडलेल्याला देण्यात येणार आहे.त्यात कविवर्या वृषाली टाकळे, रत्नागिरी, कवी यशवंत घोडे, जुन्नर, कविवर्या प्रा.शितल कांडलकर, नागपुर, कवी मोहन घुले, भोसरी, कवी यवनाश्व गेडकर, चंद्रपूर, कविवर्या सौ.पुष्पलता कोळी, जळगाव, कवी डाॅ. प्रा.सत्येंद्र राऊत, उस्मानाबाद, कवी डाॅ.लक्ष्मण हेंबाडे, सोलापुर, कविवर्या सौ. छाया ब्रम्हवंशी, गोदिंया, कविवर्या प्रा.अरुणा डांगोरे, नागपूर, कवी ज्ञानेश्वर काजळे, जुन्नर, कवी मंदार सांबारी, मालवण, कविवर्या भारती तितरे, गडचिरोली, कवी प्रा. दिलीप गोरे, चाकण इ. गौरविण्यात येणार आहे.

कविंना आदर व सन्मान मिळावा त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून गेली 23 वर्षे नक्षत्राचं देणं काव्यमंचच्यावतीने महाराष्ट्रभर हे कार्य सुरु आहे. या संस्थेने अनेकांना सन्मानाचे व्यासपीठ मिळून देऊन कविंचा व कवितेचा सन्मान केला आहे.कविंच्या काव्यलेखणीला धार मिळण्यासाठी, काव्यप्रतिभेला फुलविण्यासाठी काव्यमंच हे अनेक वर्षांपासुन प्रभावी कार्य करत आहे. या कार्यक्रमाचे संयोजन आयोजन नक्षत्रांचं देणं काव्यमंचचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी उत्तमरित्या केले आहे. यात सर्वांना विनामूल्य व मुक्त सहभाग आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.