Pune News : मद्रासी गणपतीजवळ एका इमारतीमध्ये आग,3 फ्लॅट्स व 2 दुकाने जळाली

एमपीसी न्यूज : पहाटे 3 वाजता 128 रास्ता पेठ, मद्रासी गणपतीजवळ एका इमारतीमध्ये आग लागण्याची घटना घडली. यात 3 फ्लॅट्स व 2 दुकाने जळाली. आगीत 1 चारचाकी वाहनाचे नुकसान झाले. आग लागल्यानंतर ती काही वेळातच पसरली. घटनास्थळी अग्निशमन दलाने धाव घेत आग विझवली.

_MPC_DIR_MPU_II

अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांच्या साह्याने ही आग पुर्णपणे विझवली. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, फ्लॅट्स आणि दुकानांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण समजू शकले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.