Pune News : पुणे जिल्ह्यातील जवानाचा अरुणाचल प्रदेशात कर्तव्यावर असताना मृत्यू

एमपीसी न्यूज : अरुणाचल प्रदेशात सैन्य दलात कर्तव्यावर असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील जवानाचा मृत्यू झाला आहे. संभाजी ज्ञानेश्वर राळे ( वय ३०, ता. खेड, कुरकुंडी) असे जवानाचे नाव आहे.

संभाजी राळे हे खेड तालुक्यातील कुरकुंडी येथील रहिवासी आहेत. अरुणाचल प्रदेशातील तेजपूर याठिकाणी ते कर्तव्यावर होते. तब्येत खालावल्यामुळेे त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. संभाजी राळे यांचे पार्थिव आज सकाळी ८:३० वाजता लोहगाव विमानतळावर पोहोचणार आहे. त्यानंतर शासकीय रुग्णवाहिकेतून कुरकुंडी येथील शाळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.  शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.

मागील दीड महिन्यापूर्वी संभाजी राळे हे सुट्टीवर आपल्या परिवारासोबत एक महिना राहिले होते. त्यानंतर ते पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले. दरम्यानच्या कालावधीमध्ये तब्येत खालावल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती नातेवाईकांनी दिली. राळे यांच्या मागे आई, वडील, तीन बहिणी असा परिवार असून संभाजी हे परिवारात एकुलते एक होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87aa3270282e6390',t:'MTcxNDE3MjUxNC42MjMwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();