मोडक दांपत्याने मूल्याधिष्ठित जीवनाचा संदेश दिला -अभय फिरोदिया

एमपीसी न्यूज – शाहू मो़डक आणि प्रतिभा मोडक या दांपत्याने जैन धर्माला अभिप्रेत असलेल्या नैतिक मार्गावरून वाटचाल करून समाजाला एक आदर्श घालून दिला. प्रतिभा मोडक यांच्या आत्मचरित्राच्या रूपाने हा आदर्श पुस्तक रूपाने समाजापुढे येत आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया यांनी सोमवारी व्यक्त केली.

प्रतिभा शाहू मोडक यांच्या ‘मी प्रतिभा शाहू मोडक’ या आत्मचरित्राचे प्रकाशन स्नेहल प्रकाशनाच्या वतीने फिरोदिया यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी लेखिका प्रतिभा शाहू मोडक, माजी आमदार उल्हास पवार, पुस्तकाचे अनुवादक समृद्ध कुलकर्णी व स्नेहल प्रकाशनाचे संचालक रवींद्र रवींद्र घाटपांडे आदि उपस्थित होते.

Abdul Sattar to aditya thackeray : तुम्ही राजीनामा द्या, मी देतो ट्रायल मॅच होऊनच जाऊ द्या; सत्तारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान

फिरोदिया म्हणाले, की तुमच्या आयुष्यात चढउतार येतील. वेगवेगळे अनुभव येतील. त्यात मूल्याधिष्ठित राहा, आनंद माना, परिपूर्णता माना, हा जैन धर्माने घालून दिलेला मार्ग आहे. स्व. शाहू मोडक आणि प्रतिभाताई यांनी तोच आदर्श समाजापुढे मांडला. त्याचा सर्वधर्मीय नागरिकांवर परिणाम झाला. आधुनिक जगात जुन्या व बुरसटलेल्या कल्पना सोडून द्या आणि मूल्याधिष्ठित जीवन जगा हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या आयुष्याचा हा संदेश आपल्याला आता पुस्तकाच्या रूपाने मिळाला आहे. याहून मोठी आनंदाची गोष्ट नाही.

लेखिका प्रतिभा मोडक मनोगत मागील 15 वर्षांपासून रवींद्र घाटपांडे हे पुस्तक लिहिण्याबाबत सांगत होते. मात्र खूप खरे लिहिता येत नव्हते आणि खोटे लिहायचे नव्हते. त्यामुळे मी लिहीत नव्हते. कोरोनाच्या कालावधीत निवांतपणा मिळाल्यामुळे या पु्स्तकाचे लेखन झाले. अनुवादाच्या बाबतीतही सूचना कराव्या लागल्या नाहीत, असे सांगून यांनी पुस्तक लेखनासह आत्मचरित्रातील विविध प्रसंग आणि अनुभव सांगितले.

उल्हास पवार यांनी शाहू मोडक यांच्या आठवणींना उजाळा देत ‘वर्तमान आनंददायी कसे करावे, याचे मूर्तिमंत उदाहरण प्रतिभा मोडक आहेत,’ या शब्दांत त्यांचे कौतुक केले. समृद्ध कुलकर्णी यांनी अनुवादाचा अनुभव सांगितला. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले तर रवींद्र घाटपांडे कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.