रविवार, जानेवारी 29, 2023

PMPML : पीएमपीएमएलच्या पिंपरी आगारातील फिटर मुलाणी यांनी बनवले ‘फिरते वॉशिंग’ सेंटर

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलचे फिटर बाबासाहेब मुलाणी (PMPML) यांनी तीन दिवसात फिरते वॉशिंग सेंटर तयार केले आहे. त्यांच्या य़ा भन्नाट कल्पनेमुळे बी.आर.टी. मार्गावरील अस्वच्छ बस थांबे स्वच्छ करणे सहज शक्य होणार आहे.

त्यांच्या या भन्नाट कल्पनेमुळे अस्वच्छ वाटणारे बस थांबे आता कमी वेळात व कमी मनुष्यबळात पाण्याने धुवून स्वच्छ करता येणार आहेत. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरात कौतुक केले जात आहे. मुलाणी हे पीएमपीएमएलच्या पिंपरी आगारात फिटर म्हणून काम करतात. अनेक यांत्रिकी बाबींशी संलग्न काम करणारे कर्मचारी हे कल्पकता लढवून आपल्या परीने कामात सोप्पेपणा आणण्यासाठी नावीन्यपूर्ण गोष्टी करत असतात.

बी.आर.टी. मार्गावरील अस्वच्छ बस थांबे ही सर्वात मोठी आणि नागरिकांना त्रासदायक गोष्ट आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पिंपरी आगाराचे आगार व्यवस्थापक भास्कर दहातोंडे व पिंपरी आगार अभियंता राजकुमार माने यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब मुलाणी यांनी 1 एच.पी.ची मोटर, 2 हजार लिटर पाण्याची टाकी व अन्य टाकाऊ साहित्यापासून सर्व्हिस व्हॅनमध्ये ‘फिरते वॉशिंग’ सेंटर तयार केले आहे.

Bhosari Crime : नांदायला का येत नाही म्हणत पत्नीचे डोके भिंतीवर आपटले

या वॉशिंग सेंटरसाठी पार्ट कोणते वापरायचे? त्याची (PMPML) रचना कशी करायची? याचा अभ्यास करून त्यांनी एक डिझाईन तयार करून पार्ट्स बनवून घेतले व ते सर्व्हिस व्हॅनमध्ये जोडले. सिंगल फेज विजेवर चालणारी मोटार जोडून 3 दिवसांच्या प्रयत्नानंतर हे ‘फिरते वॉशिंग’ सेंटर तयार झाले आहे.

‘फिरते वॉशिंग’ सेंटर तयार केल्याबद्दल आगार व्यवस्थापक भास्कर दहातोंडे, आगार अभियंता राजकुमार माने व फिटर बाबासाहेब मुलाणी यांचे महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया व सहव्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा पोतदार – पवार यांनी कौतुक केले आहे.

Latest news
Related news