Bhosari Crime : नांदायला का येत नाही म्हणत पत्नीचे डोके भिंतीवर आपटले

एमपीसी न्यूज – नांदायला का येत नाही पतीने पत्नीचे डोके भिंतीवर आपटले. त्यात पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी (दि. 23) दुपारी एक वाजताच्या (Bhosari Crime) सुमारास एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आळंदी रोड येथे घडली.

आनंद जगदेवआप्पा धनशेट्टी (वय 32, रा. चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी जखमी 20 वर्षीय पत्नीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune Crime : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचे कोंम्बिंग ऑपरेशन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी पती यांच्यात वाद झाल्याने फिर्यादी माहेरी राहत होत्या. त्यावरून आरोपीने तू घरी का राहायला येत नाही, (Bhosari Crime) असे म्हणत लोखंडी गजाने मारहाण केली. फिर्यादी यांचे डोके भिंतीवर आपटून त्यांना गंभीर जखमी केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.