Pune : लग्नाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून (Pune) एकाने महिलेवर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार 2018 ते जानेवारी 2023 दरम्यान चिखली आणि सिंहगड कॉलनी येथे घडला.

याप्रकरणी 30 वर्षीय पीडित महिलेने मंगळवारी (दि. 24) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिलीप कलप्पा बजंत्री (वय 31, रा. सलगर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PMPML : पीएमपीएमएलच्या पिंपरी आगारातील फिटर मुलाणी यांनी बनवले ‘फिरते वॉशिंग’ सेंटर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे (Pune) आमिष दाखवले. फिर्यादी यांची इच्छा नसतानाही त्यांच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्नास नकार देऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.