India’s Test Series Win : टिम इंडियावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव, वाचा कोण काय म्हणाले 

एमपीसी न्यूज – भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर धोबीपछाड करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. अनेक खेळाडू नवखे असताना, दुखापत ग्रस्त असताना देखील भारतीय संघाने विश्वास आणि अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत चार सामन्यांची मालिका 2-1 ने आपल्या नावावर केली. भारतीय संघाच्या या कामगिरीचे जगभरातून कौतुक केलं जात आहे. जगातील अनेक दिग्गज आजी माजी खेळाडुंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

भारतीय संघाचा विजय झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा प्रशिक्षक जस्टिन लॅन्गरने दिलेली प्रतिक्रिया काल दिवसभर सोशल मिडियावर ट्रेंडिंग होती. लॅन्गर म्हणाले, ‘तुम्ही कोणतीच गोष्ट हलक्यात घेतली नाही पोहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीयांना कधीच, म्हणजे कधीच हलक्यात घेऊ नका. 150 कोटी लोकसंख्येच्या देशातील अकरा खेळाडूंना संघात जागा मिळाली आहे. म्हणजे ते नक्कीच खास आहेत. हा आमच्यासाठी खुप मोठा धडा आहे.’

बीसीसीआय अध्यक्ष गांगुली यांनी भारतीय संघाला विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. हा भन्नाट विजय आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन अशाप्रकारे मालिका विजय मिळवणे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात हे कायम लक्षात ठेवलं जाईल, भारतीय टीमला पाच कोटींचा बोनस जाहीर करण्यात येत आहे. खरं तर या विजयाची कोणत्याही आकड्यामध्ये तुलना करता येणार नाही. सर्व सदस्य खूप छान खेळले. अभिनंदन, असं गांगुली यांनी म्हटलं आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीस संघाचे तोंडभरून कौतुक करत हि इतिहासातील सर्वात मोठी जीत असल्याचे म्हंटल आहे. प्रत्येक वेळी आपल्याला एक नवा हिरो सापडला, जितक्या वेळा आपण खाली कोसळलो तिचक्याच क्षमतेनं पुन्हा उभं राहिलो. दुखापती, अनिश्चिचता होती पण आत्मविश्वास त्याहून मोठा होता. हा विजय मोठा विजय आहे असं तेंडुलकरने म्हंटले आहे.

दक्षिण आफ्रिकेचा आक्रामक फलंदाज एबी डिविलियर्स म्हणाला, ‘काय कसोटी झाली! भारतीय क्रिकेटची खोली भयानक आहे. ऋषभ पंत फार छान खेळलास’ असं त्याने ट्वीट केलं आहे.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अक्तरने भारतीय संघाच्या सर्वच बाबतीत कौतुक केलं आहे. अक्तरने त्याच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ प्रसारित करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने संघाचा विश्वास, नव्या खेळाडूंच्या मेहनतीचं कौतुक केलं आहे. तसंच बीसीसीआय आणि अजिंक्य रहाणे व प्रशिक्षक रवी शास्त्री यांना दाद दिली आहे.

गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी भारतीय संघाच्या विजयाचे कौतुक करत, हा सर्वात मोठा कसोटी विजय असल्याचे म्हंटले आहे. टिम इंडियाला शुभेच्छा देत त्यांनी ऑस्ट्रेलिया संघाच्या खेळाचे कौतुक केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. संघाची जिद्द आणि आत्मविश्वासाचं कौतुक त्यांनी केलं आहे. संघाच्या कामगिरीची उत्तम असल्याचे म्हणत त्यांनी संघाला भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

याशिवाय अनेक आजी माजी खेळाडू, राजकाराणी, सिने अभिनेत्यांनी भारतीय संघ आणि त्यांच्या खिलाडूवृत्तीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. काल दिवसभर भारातीय संघ आणि खेळाडू यांच्या जबरदस्त कामगिरी बाबत सोशल मिडियावर अनेक मिम्स व्हायरल झाले.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 369 धावा केल्या आणि भारताने प्रत्युत्तरात 336 धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 33 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 294 धावा करत भारताला विजयासाठी 328 धावांचे आव्हान दिले. भारतीय संघाने शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या जोरावर 328 धावांचे कठीण आव्हान पार केलं

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.