Aalandi : एमआयटी महाविद्यालयात रूबिकोनतर्फे व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा संपन्न

एमपीसी न्यूज- आळंदी येथील एम आय टी कला वाणिज्य आणि (Aalandi) विज्ञान महाविद्यालयमध्ये कंप्यूटर अॅप्‍लीकेशन विभागाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तृतीय वर्ष बीबीए सीए च्या विद्यार्थ्यांना व्यावसायीक मुलाखतीस सामोरे कसे जावे याची माहिती आणि प्रत्यक्ष अनुभव करून देण्यात आले.
मुलाखतीची भिती, संशय, साॅफ्ट स्किल, टिम बिल्डिंग, काॅन्फिडेन्स बिल्डिंग इ. बद्दल 6 सत्रात विविध अॅक्टीविटी विद्यार्थ्यांसाठी घेतल्या गेल्या.या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.या कार्यक्रमाचे आयोजन 26 एप्रिल ते 28 एप्रिल पर्यंत करण्यात आले होते.

 कार्यशाळेसाठी  रूबिकोनचे  मॅडी पिल्लई आणि  संग्राम बागराळे यांनी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे, उपप्राचार्या अक्षदा कुलकर्णी, विभाग प्रमुख डॉ. विकास महांडुळे यांनी आयोजनाचे कौतुक केले. कार्यशाळा आयोजनासाठी प्रा. सारिका गाडेकर, प्रा. डॉ. भारती कवडे, डॉ. सुनील पाटिल आणि प्रा. योगेश पाटील यांनी परीश्रम घेतले.ययाबाबत माहिती राहुल बाराथे यांनी (Aalandi) दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.