Lonavala News : श्रावणी सोमवार निमित्त लोहगड व विसापूर किल्ल्यावर अभिषेक

एमपीसी न्यूज – लोहगड- विसापूर किल्ल्यावर शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड-विसापूर विकास मंच यांच्यावतीने सोमवारी (दि.30) अभिषेक करण्यात आला. लोहगड, घेरेवाडी, भाजे, पाटण, मळवली येथील ग्रामस्थांच्या वतीने मर्यादित लोकांच्या उपस्थित हा अभिषेक करण्यात आला. गेल्या 21 वर्षापासून हा उपक्रम राबविला जातो.

अभिषेकासाठी शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाहक सुधीर थोरात, मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, बसाप्पा भंडारी, गजानन तिकोणे, रुपेश लोखंडे, बाळकृष्ण कोंडभर, पैलवान तिकोणे, बाळासाहेब ढाकोल व रायगड स्मारक समितीचे सदस्य रुपेश मोरे, विनीत गाडगीळ आदी उपस्थित होते.


श्रावणातील चारही सोमवारी हा अभिषेक करण्यात आला. जगाला कोरोना महामारीतुन मुक्त कर असं साकडं यावेळी महादेवाला घातले. अभिषेकानंतर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

लोहगड-विसापूर विकास मंच अध्यक्ष विश्वास दौंडकर, कार्याध्यक्ष सागर कुंभार, अनिकेत आंबेकर, मुकुंद तिकोणे, अजय मयेकर, अमोल मोरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.