Pune News : नागरिकांच्या तक्रारीची दाखल घ्या, अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमनार यांनी सर्व विभाग प्रमुखांना खडसावले

एमपीसी न्यूज –  महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या सोयीसाठी तक्रार व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मात्र, याद्वारे आलेल्या तक्रारी कर्मचारी तसेच अधिकारी परस्पर बंद करत आहेत. विशेष म्हणजे, या तक्रारी सोडवल्याच जात नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे यापुढे तक्रारींची योग्य दखल घेण्याचे आदेश देत अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमनार यांनी सर्व विभाग प्रमुखांना खडसावले आहे.

शहरातील विविध भागातील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रार आल्यानंतर अधिकाऱ्यांकडून काम न करता तक्रारी बंद केल्या जात आहेत तसेच वेळच्या वेळी संबंधित अधिकारी यांना पाठविल्या केल्या जात नाहीत. या तक्रारी अधिकारी सेवक यांच्याकडून तक्रारी काम न करता किंवा अर्धवट काम करून बंद केल्या जातात तसेच इतर विभागांचा संबंध नसतानाही त्या इतर विभागांना पाठवून वेळकाढूपणा केला जातो. त्यामुळे हे आदेश देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.