Adhik Mas : ओळख मराठी महिन्यांची – भाग 5 – दानाचं महत्त्व सांगणारा अधिक महिना

एमपीसी न्यूज (रंजना बांदेकर) : अधिक मास या आजपासून सुरू होणाऱ्या अधिक (Adhik Mas)महिन्याच्या सर्वांना शुभेच्छा!

मराठी महिन्यांची ओळख या लेखमालिकेतील हा पाचवा लेख. मी जेव्हा मराठी महिन्यांची माहिती लिहायची ठरवली तेव्हा मला माहितही नव्हतं की यावर्षी अधिक मास आहे.

पण म्हणतात ना ‘अधिकस्य अधिक फलम’ त्याप्रमाणे मला बारा महिन्यांच्या ऐवजी तेरा महिन्यांची माहिती लिहायला मिळाली.

हिंदू पंचांगातील महिने हे चंद्राच्या स्थितीवर अवलंबून आहेत तर इंग्रजी महिने सौर म्हणजे सूर्याच्या स्थितीवर अवलंबून आहेत. आपल्या कालगणनेत चंद्र आणि सौर पद्धतीचा उत्तम असा मेळ घातलेला आहे.

या गणितावरून येणारा जास्तीचे दिवस असतात, त्याचा पूर्ण एक (Adhik Mas) महिना तयार होतो आणि तोच महिना अधिक मास म्हणून ओळखला जातो. अधिक महिन्यात 33 या संख्येला खूप महत्त्व आहे.

अधिक मासाला पुरुषोत्तम मास, धोंड्या मास आणि मलमास अशी ही नावे आहेत.

अधिक महिन्याला ‘पुरुषोत्तम मास’ हे नाव कसे पडले याबद्दल एक कथा आहे. अधिक महिन्यात कोणतेही चांगले कार्य केले जात नाही, त्याला वाईट महिना म्हणून ओळखले जायचे याचे त्या महिन्याला खूप वाईट वाटायचे म्हणून तो विष्णूकडे गेला.

विष्णूने त्याला श्रीकृष्णाकडे नेले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला मी माझे नाव तुला देतो म्हणून हा महिना पुरुषोत्तम मास असे म्हणून ओळखला जातो.

कृष्णाने सांगितले की हा सर्वोत्तम महिना आहे. या महिन्यात लोक जास्तीत जास्त दानधर्म करतील त्यामुळे हा महिना पुण्यकारक मास म्हणून ओळखला जाईल.

अधिक महिन्यात विष्णू पूजेला महत्त्व आहे. दिवसातून एकदा विष्णुसहस्त्रनाम ऐकावे किंवा म्हणावे त्यामुळे अधिक फायदा होईल असे सांगितले आहे. तसेच दान देण्याची पद्धत आहे.

‘अप्रूप’ म्हणजे जाळीदार पदार्थ अनारसे, मैसूर पाक, बत्तासे यासारखे पदार्थ दान दिले जातात.

विवाह समारंभात कन्यादानाच्या वेळी जावयाला विष्णू आणि मुलीला लक्ष्मी मानतात म्हणून अधिक महिन्यात विष्णू रुपी जावयाला 33 अनारसे देण्याची पद्धत आहे.

 Kalewadi : हटकले म्हणून सिमेंटच्या गट्टू ने गाडीची तोडफड करत दिली धमकी 

या महिन्यात धोंडे सुद्धा दान करतात. दीपदान सुद्धा करतात. या महिन्यात त्यागाला खूप महत्त्व आहे, त्यामुळे जास्तीत जास्त दान करा केले जाते.

अशा रीतीने आलेला हा अधिक महिना व्रतवैकल्याने सजलेला असतो. देवदर्शन, दानपुण्य यामध्ये हा महिना कसा जातो ते सुद्धा समजत नाही. यावर्षी श्रावण महिना अधिक आहे. त्यामुळे आपण पुढच्या महिन्यात नीज श्रावणात भेटणार आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.