Pune News : आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या सीईओ रेखा दुबे यांचा एएचपीआयकडून गौरव

एमपीसी न्यूज – एएचपीआय ग्लोबल कॉँन्क्लेव्ह 2022 मध्ये असोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (इंडिया) – एएचपीआयच्या वतीने आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल (पुणे)च्या सीईओ रेखा दुबे यांनी आरोग्य क्षेत्रात बजावलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. एएचपीआय वार्षिक जागतिक शिखर परिषद 2022 चे आयोजन 22 आणि 23 एप्रिल रोजी मुंबईतील हॉटेल ललितमध्ये करण्यात आले होते.

आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल हे मल्टी-स्पेशियलिटी टर्शिअरी केअर हॉस्पिटल पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्यातील पुण्यातील पिंपरी-चिंचवड भागात आहे. आयएसओ 22000:2005 आणि एचएसीसीपी अधिस्वीकृती लाभलेले हे भारतामधील पहिले रुग्णालय असून जॉइंट कमिशन इंटरनॅशनल (जेसीआय, यूएसए), एनएबीएचद्वारा अधिस्वीकृत हे महाराष्ट्रातील पहिले रुग्णालय ठरणार आहे. त्याशिवाय आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलला सीएपी (युएसए) आणि एनएबीएलची अधिस्वीकृती लाभलेली आहे.

रेखा दुबे या आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, पुणे येथील मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) असून त्या आदित्य बिर्ला समूहाच्या संचालक सदस्य मंडळावरही कार्यरत आहेत. आरोग्य क्षेत्रात मागील दोन दशकांपासून तर आदित्य बिर्ला समुहासह मागील पंधरा वर्षांपासून रेखा दुबे कार्यरत असून सर्वोत्तम आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून जागतिक पटलावर रुग्णालयाला घेऊन जाणारे हे महिला नेतृत्व आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज रुग्णालयाला जागतिक दर्जा प्राप्त झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.