Pune : सूर्यग्रहणानंतर लोकांना आंघोळ करावी लागते म्हणून पाईपलाईन दुरुस्तीचे काम पुढे ढकला; भाजप नगरसेविकेची अजब मागणी

एमपीसी न्यूज – पुणे शहरात गुरुवारी (दि.26) पाईपलाईन दुरुस्तीच्या कामाकरिता पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र उद्या गुरुवारी (25 डिसेंबर) सूर्यग्रहण आहे. सूर्यग्रहण झाल्यानंतर लोकांना अंघोळ करावी लागते. त्यामुळे गुरुवारी होणारे पाईपलाईन दुरुस्तीचे काम पुढे ढकला, अशी अजब मागणी पुणे महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका मंजूश्री खर्डेकर यांनी केली.

मागील काही दिवसांपासून दर गुरुवारी संपूर्ण पुणे शहरातील पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीच्या अत्यावश्यक कामासाठी बंद ठेवण्यात येतो. परंतु यावेळी सूर्यग्रहण असल्यामुळे हा पाणीपुरवठा बंद ठेवू नये, अशी मागणी मंजूश्री खर्डेकर यांनी केलीय.

आज बुधवारी (२५ डिसेंबर) दर्श अमावस्या आहे तर गुरुवारी (२६ डिसेंबर) सूर्यग्रहण आहे. हिंदु धर्मात ग्रहणकाळानंतर स्नान करण्याची परंपरा आहे. त्यामुळे त्या दिवशी पाणीपुरवठा बंद राहिल्यास व दुसऱ्या दिवशी कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा झाल्यास नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. त्यामुळे गुरुवार ऐवजी अन्य दिवशी देखभाल दुरुस्ती करावी, अशी मागणी खर्डेकर यांनी केली. यासंदर्भात त्यांनी महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते धीरज घाटे यांना निवेदनही दिले आहे. त्यामुळे या मागणीबाबत पुणे महापालिका काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.