Bhosari : ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून सोन्याचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून दोन अनोळखी चोरट्यांनी दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 14 डिसेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज शाळेजवळ भोसरी येथे घडली.

सीताबाई शिवराम आवारी (वय 75, रा. चंदननगर, खराडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथे छत्रपती शिवाजी महाराज शाळेसमोरील रस्त्यावरून फिर्यादी सीताबाई पायी चालत जात होत्या. त्यावेळी दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या पिशवीमधून 20 हजार रुपये किमतीचे दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.