Talegaon Dabhade News : श्रीराम मंदिर जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अक्षय दाभाडे

एमपीसी न्यूज – सरसेनापती श्रीमंत सरदार दाभाडे घराण्याच्या मालकीच्या या मंदिरामध्ये सालाबाद प्रमाणे श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. तळेगाव दाभाडे येथील या ऐतिहासिक श्रीराम मंदिर जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अक्षय दत्तात्रय दाभाडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी गौरव दत्तात्रय तापकीर, तुषार पांडुरंग सावंत यांची निवड झाली.

यावर्षी श्रीराम मंदिर, दाभाडे आळी येथे झालेल्या श्रीराम जन्मोत्सव समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी संतोष हरिभाऊ दाभाडे (पाटील), माजी नगरसेवक सुरेश यशवंत दाभाडे, सुनील मारुती दाभाडे, सागर उत्तम दाभाडे, दीपक ज्ञानेश्वर दाभाडे, अंकुश रामचंद्र दाभाडे, विशाल साहेबराव दाभाडे, संपत विष्णू दाभाडे, रमेश भिकन दाभाडे, आनंद सोपान दाभाडे सह मंडळाचे सभासद उपस्थित होते.

सालाबाद प्रमाणे धुमधडाक्यामध्ये होणारा श्रीराम जन्मोत्सव गेली दोन वर्षे कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासकीय नियमानुसार करण्यात आला होता. यावर्षी कोरोना संक्रमणाची स्थिती कमी झाल्याने श्रीराम जन्मोत्सव विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाने साजरा करण्याची भावना नवनिर्वाचित अध्यक्ष अक्षय दाभाडे यांनी व्यक्त केली. अक्षय दाभाडे हे सध्या सरसेनापती उमाबाई दाभाडे गणेश मंडळ दाभाडे आळीचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

श्रीराम जन्मोत्सव समितीची सन 2022 कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – उपाध्यक्ष -गौरव दत्तात्रय तापकीर,तुषार पांडुरंग सावंत, खजिनदार – प्रणव विक्रम दाभाडे, सहखजिनदार – आकाश अशोक दाभाडे, मयूर विजय शिंदे, चिटणीस – केतन शिवाजी दाभाडे, सहचिटणीस – ऋषिकेश सोमनाथ ठोंबरे,अक्षय प्रदीप शेलार, कार्याध्यक्ष-प्रशांत एकनाथ दाभाडे, स्वप्निल काळूराम दाभाडे यांची सर्वानुमते श्रीराम जन्मोत्सव समितीमध्ये पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.