Akurdi : भारतात सर्वच क्षेत्रात महिलांचे क्षितीज विस्तारत आहे

एस. बी. पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मधील चर्चा सत्रात युवा महिला उद्योजिकांनी नोंदवले निरीक्षण

एमपीसी न्यूज – गेल्या काही वर्षांत भारतामधील महिलांनी वैज्ञानिक, औद्योगिक, संशोधन, नोकरी, व्यवसाय अशा अनेक क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. (Akurdi) जुन्या पारंपरिक जोखडातून मुक्त होत महिलांनी बौद्धिक, शारीरिक, कणखर मानसिकतेची चुणूक दाखवून वेगळा ठसा उमटविला आहे. त्यामुळे भारतात सर्वच क्षेत्रात महिलांचे क्षितीज विस्तारते आहे, असे निरीक्षण युवा महिला उद्योजिकांनी स्वानुभवातून नोंदवले.

आकुर्डी येथील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीइटी) संचालित एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) येथे ‘कन्व्हर्जन – 2023’ या माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन  करण्यात आले होते. त्यावेळी उद्योजिका ख्याती खंडेलवाल को-फाउंडर 2 व्हीलर, विदुषी विजयवर्गीय संस्थापिका इसाक फ्रेग्नन्स, गुंजन गोयल संचालिका गोयल गंगा ग्रुप मीडिया व मार्केटिंग, भवती पटाडीया विभाग प्रमुख मार्केटिंग ब्राण्ड मीडिया आणि कम्युनिकेशन, अनुपमा को – फाउंडर सिओओ विनोव्हेट बायोसोल्युशन्स प्रा. लि., श्री जी प्रतिनिधी विज्ञान शाळा, संस्थेच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर आदी उपस्थित होते.

PCMC : दोन दिवसांपूर्वी दंडात्मक कारवाई अन् आज झाल्या सेवानिवृत्त!

केंद्रीय युवा आणि खेळ मंत्रालय यांच्या सहयोगाने ‘वाय – 20’ ‘वाय आय’ देशातील महिला उद्योजिकांचे कार्य व अनुभव या विषयावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद व चर्चा सत्र घेण्यात आले. (Akurdi) डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, माजी विद्यार्थ्यांचे योगदान हे कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या विकासासाठी महत्वाचे असते. कारण एखादया व्यक्तीवर झालेली शैक्षणिक जडण – घडण हे त्याच्या भावी आयुष्याशी निगडीत असते. ज्याप्रमाणे महाविद्यालयाच्या नावामुळे विद्यार्थ्यांची ओळख निर्माण होते, त्याचप्रमाणे माजी विद्यार्थ्यांच्या योगदानामुळे संस्था नाव लौकीकास येते. आज संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी विविध कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. या कार्यक्रमात एकूण 180 माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, उद्योजक अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.(Akurdi) सूत्रसंचालन डॉ. काजोल महेश्वरी, डॉ. मीरा भन्साळी, डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन यांनी केले. आभार भरत ओसवाल यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. स्वप्नील सोनकांबळे यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.