Maval : बाजार समितीच्या निवडणुकीत 98.27 टक्के मतदान; आता उत्सुकता निकालाची

एमपीसी न्यूज – मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.28) मतदान पार पडले. 98.27 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. (Maval) मतमोजणी शनिवारी (दि. 29) सकाळी 9 वाजता मावळ पंचायत समितीच्या सभागृहात होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक शिवाजी घुले यांनी दिली. मतदानानंतर उमेदवारांसह मतदारांना देखील निकालाची उत्सुकता लागली आहे. 

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत 18 जागांसाठी 40 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असुन भाजपा, काँग्रेस, शिवसेना, आरपीआय छत्रपती शिवाजी महाराज सर्व पक्षिय सहकार परिवर्तन पॅनेल व राष्ट्रवादी, एसआरपी महाविकास आघाडीचे सहकार पॅनेल यांच्यात सरळ लढत होत असून चार जण अपक्ष आहेत.

सकाळी पाऊस दुपारी कडक उन्हात मतदार उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रावर उपस्थित होते.(Maval) मतदारांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.

 

Akurdi : भारतात सर्वच क्षेत्रात महिलांचे क्षितीज विस्तारत आहे 

सकाळी 8 ते सायंकाळी 4 पर्यंत 1 व 2 मतदान केंद्र कृषी पतसंस्था मतदान 648 पैकी 643 झाले, 3, 4 व  5 मतदान केंद्र ग्रामपंचायत सदस्य  मतदान 852 पैकी 836 झाले, 6 मतदान केंद्र व्यापारी व आडते मतदान 108 पैकी 101 झाले व 7 मतदान केंद्र हमाल व तोलारी मतदान 10 पैकी 10 झाले.  एकूण 1618 मतदानापैकी 1590 मतदान झाले. एकूण 98.27 टक्के मतदान झाले.

18 जागेसाठी निवडणुकीच्या रिंगणात 40 उमेदवार असून आज (दि.28) मतदान असल्याने मावळ पंचायत समितीच्या परिसरात आजी माजी आमदार, पक्षाचे, सहकारी संस्थेचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आदींची मतदानासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत होता. पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पंचायत समिती व जिल्हा परिषद  निवडणूकीची सेमी फायनल असल्याचे वातावरण निर्माण झाले होते. एका मताला 10 ते 15 हजार रूपयांचा भाव फुटला असल्याची चर्चा रंगली होती. (Maval) कृषी उत्पन्न बाजार समितीवर आमचेच वर्चस्व प्रस्थापित होणार असल्याचा दावा दोन्ही पॅनेलकडून केला जात आहे.

.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.