Pune : पर्यावरणाचा ऱ्हास आणि गावांचे नुकसान होणार असेल तर प्रकल्पाला नक्की विरोध करा – अजित पवार 

एमपीसी न्यूज : बारसू येथील रिफायनरी प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास आणि गावांचे नुकसान होणार असेल तर विरोध नक्की करा. (Pune) पण त्यातून जर फायदा होणार असेल तर त्याचा देखील नागरिकांनी विचार करायला हवा अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.

बारसू येथील रिफायनरीला विरोध करण्यासाठी नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्या आंदोलकावर लाठीचार्ज झाल्याची घटना घडली आहे.त्या प्रश्नावर अजित पवार यांनी भूमिका मांडली.

Maval : बाजार समितीच्या निवडणुकीत 98.27 टक्के मतदान; आता उत्सुकता निकालाची

यावेळी अजित पवार म्हणाले की,बारसू येथील रिफायनरी प्रकल्पा बाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी शरद पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तसेच माझ देखील उदय सामंत यांच्या सोबत बोलणे झाल आहे. त्या प्रकल्पामुळे तेथील गावांच किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही.अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.याबाबत उदय सामंत यांनी सांगितले आहे.पण तेथील नागरिक जर विरोध करित असतील तर त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे.त्यामुळे शंकांचे निरसन होईपर्यंत सर्वेक्षण थांबवले पाहिजे.अशी माझी भूमिका आहे.तसेच गरज पडल्यास मी देखील आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यास जाईल अशी भूमिका देखील त्यांनी मांडली.

तसेच ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेहमीच विकासाबाबत सकारात्मक भूमिका राहिली आहे.आपल्या राज्यातून अनेक प्रकल्प बाहेर गेलेले आहेत. (Pune) आपण पाहिले पण यातून जर रोजगार मिळणार असेल आणि तेथील वातावरण आणि निसर्गाला बाधा येणार नसेल तर शहानिशा करायला हवी,अशी भूमिका देखील त्यांनी मांडली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.