Akurdi : गुंतवणुकीच्या बहाण्याने दीड कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज – नवीन प्रकल्पात (Akurdi) गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे तसेच इतर कारणे सांगून एका व्यक्तीकडून एक कोटी 44 लाख रुपये घेत फसवणूक केली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 9 मे 2022 ते 21 नोव्हेंबर 2023 या कालावधीत जय गणेश व्हिजन आकुर्डी येथे घडली.

रीशांत रमेश सिंग (रा. सफदरगंज इन्क्लेव्ह, नवी दिल्ली), संजयसिंग तोमर (रा. जयपूर, राजस्थान) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी परीक्षित बलवंत नामपूरकर (रा. गहुंजे, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना नवीन प्रकल्पासाठी पैशांची आवश्यकता असून त्यात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देतो, असे आमिष दाखवले. आरोपींनी परीक्षित यांच्याकडून 60 लाख 60 हजार रुपये घेतले. या बदल्यात आरोपींनी बिहार येथील एक घर तारण ठेवले.

Bopkhel : दहा लाखांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी

ते घर पूर्वीच एका जोडप्याकडे गहाण होते. परीक्षित यांनी पैशांची मागणी केली असता रीशांत सिंग याने कुवेत येथून 24 कोटी 80 लाख 46 हजार 120 रुपये आले असून ते स्वत:च्या खात्यावर क्रेडीट करून घेण्यासाठी अनेकांना पैसे द्यावे लगणार आहेत.

त्यासाठी आणखी पैशांची आवश्यकता असून जर फिर्यादी यांनी आणखी 80 लाख रुपये दिले तर त्या बदल्यात आरोपी फिर्यादी यांना चार कोटी रुपये देतील, असे आमिष दाखवण्यात आले. फिर्यादीकडून आणखी 84 लाख रुपये घेऊन तसा समजुतीचा करारनामा दिल्ली येथे करून घेतला. त्यानंतर फिर्यादीकडून घेतलेले एक कोटी 44 लाख रुपये त्यांना परत न करता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.