Akurdi : नादवेध संगीत अकादमीच्या गुरुअभिवादन सोहळ्यात रसिक मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज- नादवेध संगीत अकादमीच्या वतीने आयोजित शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत मैफिलीला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. युवा गायक अथर्व कुलकर्णी यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.

आकुर्डी येथील मौनीबाबा वृद्धाश्रम येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गायक अथर्व कुलकर्णी यांनी यमन रागातील बंदिश, भजन, गझल, असे विविध प्रकार सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले

त्यांना तबल्यावर निलेश शिंदे यांनी, हार्मोनियमवर धनावर्षां प्रभुणे यांनी तर गिटारवर डॉ सतीश गोरे यांनी साथसंगत केली. या कार्यक्रमाला, माजी नगरसेवक राजेंद्र साळुंके, राजाभाऊ चिंचवडे, युवानेते शेखर चिंचवडे, निलेश मरळ, आबा चिंचवडे, सूत्रसंचालक आणि निवेदक नाना शिवले, दशरथ शिंदे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन शर्मिला शिंदे, निलेश शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरणकुमार काटकर, संतोष गायकवाड, अर्थव काळे, राजकुमार काळे यांचे मार्गदर्शन लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.