Akurdi News : कपड्याच्या दुकानाला आग; वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथील म्हाळसकांत चौकाजवळ एका कपड्याच्या दुकानाला आग लागली. या आगीत होरपळून दुकानात राहणाऱ्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवारी, दि. 23) पहाटे तीन वाजता घडली.

भारती नंदलाल सारडा (वय 70) असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी येथील म्हाळसकांत चौकाजवळ जयहिंद चौकात सारडा क्लॉथ सेंटर नावाचे कपड्यांचे दुकान आहे. घरामध्येच दुकान बनवले आहे. मयत भारती सारडा यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर त्या एकट्याच दुकानात राहत होत्या. तर कुटुंबातील इतर सदस्य दुकानाच्या मागील बाजूला असलेल्या घरात राहत होते.

सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे भारती सारडा त्यांच्या कपड्यांच्या दुकान झोपल्या. पहाटे दुकानाला अचानक आग लागली. प्रचंड धूर आणि आग भडकली. यामध्ये होरपळून भारती यांचा मृत्यू झाला. पहाटे तीन वाजता अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर वल्लभनगर मुख्य केंद्र, प्राधिकरण उपकेंद्र, तळवडे उपकेंद्र यांचे तीन तर बजाज कंपनीचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सकाळी सात वाजेपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.