Akurdi News: पंजाबी वधू-वर मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

 

एमपीसी न्यूज – ‘पंजाबी वेल्फेअर फाउंडेशन’ (Akurdi News) पिंपरी-चिंचवड या संस्थेच्या वतीने 28 जून रोजी वधु-वर मेळावा आयोजित करण्यात आला होता. आकुर्डी येथील वृद्धाश्रमात आयोजित या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  

पुणे, पिंपरी-चिंचवडसह अहमदनगर, जळगाव, बार्शी, श्रीरामपूर येथील पंजाबी व शीख समाजाचे एकूण 400 बांधव मेळाव्यास उपस्थित होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर योगेश बहल तसेच सुरेंद्र वधवा व मनजितसिंग बिलखू होते.

Manobodh by Priya Shende Part 67 : घनश्याम हा राम लावण्यरुपी

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना योगेश बहल म्हणाले की, “पंजाबी समाज भारतातील विविध राज्यांमध्ये व्यवसायानिमित्त स्थायिक झाला आहे. पंजाबी लोकांनी त्या-त्या राज्यातील संस्कृती तसेच समाजजीवन स्वीकारल्यामुळेच त्यांची प्रगती झालेली दिसते. आधुनिक काळात शिक्षणाचे महत्त्व जाणल्यामुळे या समाजातील सुशिक्षित तरुण-तरुणी विविध नोकरी-व्यवसायात जम बसविताना दिसतात, ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. पंजाबी समाजाने बदलत्या काळानुसार स्वतःमध्येही (Akurdi News) जरूर सकारात्मक बदल घडवले पाहिजेत. याबरोबरच आपल्यातील एकोपा टिकवून ठेवला पाहिजे.”

या मेळाव्यासाठी हरीश मदान, लीना सप्रा, गीता वोहरा, योगिता भाटिया, योगेंद्र भाटिया, सनी गरेवाल, सुशील सहानी यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.