Nigdi : आकुर्डीमधील नागरी सुविधा केंद्र फोडले

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी आकुर्डीमधील नागरी सुविधा केंद्र फोडले. ही घटना गुरुवारी (दि. 18) सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली.

बशीर इब्राहिम सुतार (वय 58, रा. आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुतार यांचे आकुर्डीमधील सिद्धेश्वर क्लासिक बिल्डिंगमध्ये नागरी सुविधा केंद्र आहे. बुधवारी रात्री सातच्या सुमारास त्यांनी दुकान बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली 16 हजार 730 रुपयांची रोकड आणि 2 हजार रुपये कितमीची एक हार्डडिस्क असा एकूण 18 हजार 730 रुपयांचा ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.