Alandi: आळंदी देवस्थानतर्फे कोरोना व्हायरस उपचार केंद्रासाठी ससूनला 10 लाखाची मदत

एमपीसी न्यूज –  पुणे येथील ससून सर्वोपचार रुग्णालयाने केलेल्या आवाहनला साथ देत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने पुणे ससून रुग्णालयात कोरोना व्हायरस उपचार केंद्र प्रभावीपणे विकसित करण्यास आळंदी देवस्थान तर्फे 10 लाख रुपये मदत देण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक माउली वीर यांनी दिली.

ही रक्कम आरटीजीएसने देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.  देशात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील कीर्तनकार, प्रवचनकार, फडकरी, गायक, संगीतकार यांनी आपापल्या शिष्य परिवारास आवाहन करून घरी राहा, सुरक्षित राहण्यास आवाहन करण्याचा संदेश दिला.

मंदिरातील नित्य नैमित्तिक धार्मिक पूजा, पूजा विधी उपचार सुरू रहाणार असल्याचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.