Alandi : रस्ता विचारण्याच्या बहाण्याने गोळीबार करून तरुणाला लुटले

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जात असलेल्या तरुणाला दोन जणांनी रस्त्यात आडवले. त्याला रस्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून त्याच्या पायावर गोळीबार केला. जखमी झालेल्या तरुणाची दुचाकी आणि रोकड असा एकूण 20 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 23) रात्री नऊच्या सुमारास आळंदी ते चाकण घाट रस्त्यावर घडली.

प्रवीण हनुमंत शिंदे (वय 27, रा. राजगुरुनगर. मूळ रा. सांगली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास आळंदी होऊन चाकण घाट रस्त्याने त्यांच्या मोपेड दुचाकीवरून (एम एच 14 / जी क्यू 8609) जात होते. ते एमआयटी कॉलेज जवळ आले असता पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना अडवले. दुचाकी चालवणाऱ्या एकाने प्रवीण यांना ‘हा रस्ता चाकणकडे जातो का’ असे विचारले.

त्यावर त्याच्या मागे बसलेला दुसरा इसम म्हणाला ‘ये इसका बॉयफ्रेंड है’ हा प्रकार प्रवीण यांच्या लक्षात आला नाही. तोपर्यंत दुचाकीवर मागे बसलेल्या आरोपीने रिव्हॉल्वर काढले. त्याने प्रवीण यांच्या पायावर गुडघ्याजवळ फायर केले. यामध्ये प्रवीण जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी प्रवीण यांची दुचाकी आणि रोकड असा एकूण 20 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.