Alandi : श्रीज्ञानोबारायांच्या वारकरी केंद्री ज्ञानभूमी या प्रकल्पांतील युनीट 1 अंतर्गत भक्तनिवसाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन

एमपीसी न्यूज -दि.12 जानेवारी रोजी श्रीज्ञानोबारायांच्या वारकरी केंद्री ज्ञानभूमी या प्रकल्पांतील(Alandi) युनीट 1 अंतर्गत भक्तनिवसाचे भूमिपूजन दुपारी 3 वाजता होणार आहे.या कामाचे उदघाटन माननीय नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.

संस्थांनचे श्रींचे मालकीच्या 435 एकर जागेवर श्री ज्ञानोबारायांच्या संजीवन समधीने पुनीत(Alandi) झालेल्या अलंकापूर (श्री क्षेत्र आळंदी देवाची) नगरीमध्ये आषाढी ,कार्तिकीवारीसाठी वारकऱ्यांचे निवासाकरिता जागेची व्यवस्था करणे,निवास संकुल उभारणे,भजन किर्तनासाठी हॉल,पिण्याचेपाणी,स्नानगृह,शौचालये,भक्तनिवास, प्रसादालाय,हॉस्पिटल,ग्रंथालय,अभ्यासिका,यासारख्या सुविधा उपलब्ध करणे तसेच संतसृष्टी,अभ्यासवारी,उद्यान इत्यादी प्रकल्पांचा मास्टर प्लॅन केला आहे.

Talegaon Dabhade : कृत्रिम बुद्धिमत्तेशी जुळवून घेणे काळाची अपरिहार्यता – पृथ्वीराज चव्हाण


याबाबत माहिती व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.