Today’s Horoscope 04 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसीन्यूज -आजचे पंचांग-Today’s Horoscope 04 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग-

आजचा दिवस – गुरुवार.

तारीख 04.01.2024.

शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.

आज विशेष – कालाष्टमी.

राहू काळ – दुपारी 1.30 ते3.00.

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आज नक्षत्र – हस्त17.33 पर्यंत नंतर चित्रा.

चंद्र राशी – कन्या.
—————————–
मेष – ( शुभ रंग – भगवा)
आज वैवाहिक जीवनातील काही मतभेद संध्याकाळी निवळतील. शब्द जरा जपून वापरा. आज काही आरोग्याच्या तक्रारीने तुम्ही त्रस्त असाल. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

वृषभ ( शुभ रंग- राखाडी)
दुकानदारांची उधारी वसूल होईल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येईल. वैवाहिक जीवनात काही जुन्या आठवणी तुमच्या मनाला आनंद देतील.

मिथुन – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
हौशीमंडळी आज जीवाची मुंबई करण्यासाठी पैसा खर्च करतील. आज गृहिणी घर सजावटीभर भर देतील. कलाकारांना मात्र प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.

कर्क – ( शुभ रंग – आकाशी)
वास्तु व वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार आज टाळले तर बरे होईल. विद्यार्थी आज अभ्यासापेक्षा खेळातच जास्त रामतील. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल.

सिंह -( शुभ रंग – पांढरा)
एखाद्या कामासाठी आज तुम्हाला शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. आज काही दुरावलेली नाती जवळ येतील. तुम्ही गोड बोलून आज विरोधकांची ही मने जिंकू शकाल.

कन्या – ( शुभ रंग- आकाशी)
आज तुम्ही आपल्या मनाप्रमाणे वागाल. तुम्हाला थोडी अहंकाराची बाधा होईल. कठोर बोलल्याने नात्यात गैरसमज होतील. कुणालाही मागितल्याशिवाय सल्ले देऊ नका.

तूळ ( शुभ रंग- गुलाबी)
काही जणांना आज तातडीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. घरात थोरांच्या शब्दाला मान द्यावा लागेल. आज एखादी महत्त्वाची वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे सावध राहा.

वृश्चिक ( शुभ रंग – मोतिया)
तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने थोडी अनावश्यक खरेदी ही कराल. आज रात्रीच्या प्रवासात बेसावध राहू नका.

धनु (शुभ रंग- जांभळा)
आळस झटकून कामाला लागल. पण अति उत्साहात आज तुम्ही काही चुकीचे निर्णय घ्याल. भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊ नका. आज हाती असलेला पैसा जपून वापरा.

मकर- ( शुभ रंग – चंदेरी)
कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आपल्याच काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागणार आहे. महत्त्वाच्या चर्चेत सुसंवाद महत्त्वाचा राहील.

कुंभ – (शुभ रंग- सोनेरी)
कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतील. वरिष्ठांचे कितीही केले तरी समाधान होणे शक्य नाही. आज जोडीदारास दिलेला शब्द पाळा.

मीन ( शुभ रंग- पिस्ता)
केवळ मोठेपणासाठी आज न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला थोडी विश्रांती ही गरजेची आहे.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.