Alandi : दुकानाचा पत्रा उचकटून किराणा मालाची चोरी

एमपीसी न्यूज – दुकानाचा पत्रा उचकटून चोरट्यांनी दुकानातून किरणा माल आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 15) सकाळी सातच्या सुमारास केळगाव हनुमानवाडी येथे उघडकीस आली.

विवेक दशरथ मुंगसे (वय 26, रा. केळगाव हनुमानवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक यांचे केळगाव येथे हनुमानवाडी चाकण रोडवर ज्ञानाई सुपर मार्केट नावाचे किराणा दुकान आहे. बुधवारी (दि. 14) रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांनी दुकान कुलूप लावून बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकानाचा बाजूचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातून किराणा माल आणि रोख रक्कम असा एकूण 10 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.