Alandi : एमआयटीमध्ये ग्रंथालय सप्ताह विविध कार्यक्रमांनी साजरा

एमपीसी न्यूज : आळंदीतील माईर्स एम आय टी महाविद्यालयात (Alandi) ग्रंथालय विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाने विद्यार्थ्यांना वाचनाच्या सवयीस प्रोत्साहन देणे, व त्यांना चिकित्सक बुद्धीने विचार करण्यास प्रेरित करणे आणि विद्यार्थ्यांचे ज्ञान, प्रतिभा, कौशल्ये दाखवण्यासाठी ग्रंथालय सप्ताहाचे आयोजन केले होते. दरवर्षी प्रमाणे ग्रंथालय सप्ताह “वाचनाद्वारे आपले जीवन समृद्ध करा” या थीम वर आणि 5 व 6 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या सप्ताहाची सुरुवात बुकलेट गाय म्हणून प्रसिद्ध असलेले अमृत देशमुख यांनी लोकांना वाचण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ऑडिओ बुक सारांश सादर केला. त्या व्याख्यानाने सुरुवात करण्यात आली. ग्रंथालय सप्ताहमध्ये वाचन शर्यत, कथाकथन, ट्रेझर हंट पुस्तकाच्या शोधात, साहित्यिक वेशभूषा, साहित्य रंगमंच, ब्लॉग लेखन या विविध स्पर्धांचे आयोजन कारणात आले होते. या स्पर्धांसाठी महाविद्यालयातील 234 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

ग्रंथालय विभाग आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे केलेले अथक संघटनात्मक परिश्रम आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये महाविद्यालयामधून विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद आणि सहभाग हे या कार्यक्रमाचे यश आहे. ग्रंथालय सप्ताह साजरा करण्यामागील मुख्य भूमिका विध्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड या डिजिटल युगात निर्माण करणे, वाचनाने मानवी जीवन कसे समृद्ध होते, व वाचनाने कोणत्या प्रकारचे संस्कार होतात याची जाणीव या विविध स्पर्धा मधून विध्यार्थ्यांना करून देण्यात आली.

रिडींग रेस या स्पर्धेत आपला वाचनाचा वेग काय आहे हे विद्यार्थीना समजले. कथाकथन, ट्रेझर हंट पुस्तकाच्या शोधात, साहित्यिक वेशभूषा, साहित्य रंगमंच, ब्लॉग लेखन या विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवतना विद्यार्थ्यांना किती प्रकारचे सुंदर साहित्य (Alandi) मराठी, इंग्रजी व हिंदी भाषामध्ये आहे याची माहिती मिळाली. ग्रंथालय उपलब्ध असलेल्या संसाधने आणि साहित्यात विद्यार्थ्यांना प्रदान करणे हाच ग्रंथालयचा उद्देश नसून विद्यार्थ्यांमध्ये लपलेल्या कलागुणांना वाव देणे व चिकित्सक व बोद्धिक विकास करणे हा सुद्धा आहे.

Pune : मान्यवर लेखकांच्या पुस्तकांचे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार प्रकाशन – राजेश पांडे

कार्यक्रमाचा दुसऱ्या दिवशी व्यवस्थापन विभागातील तिसऱ्या वर्षातील आकांक्षा गोंदवले हिने वाचन आणि प्रेरक विचार यावर विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम इव्हेंट मॅनेजमेंटचा एक उत्कृष्ट नमुना होता. आणि माईर्सच्या एम आयटी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज आळंदी पुणेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी आणि ग्रंथालय सदस्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे यश होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे, उप प्राचार्या डॉ. मानसी अतितकर, प्रा. अक्षदा कुलकर्णी प्रमुख पाहुणे श्री. अमृत देशमुख, तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथालय विभागाचे प्रमुख श्री राहुल बाराथे ,राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा.अरविंद वागस्कर , कार्यक्रम समन्वयक श्री . निलेश मते , तसेच ग्रंथालय विभागातील सारिका पडवळ , सुनीता साबळे , सुवर्ण सानप व विदयार्थी स्वयंसेवक तनिष्का वीर , सर्वेश मांडे . वृषाली बिरंगल , यश खोल्लम , आदित्य आवसेकर या विद्यार्थी योगदान लाभले.याबाबत माहिती राहुल बाराथे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.