Pune : गीता आश्रम संस्थेत लक्षार्चनेचे आयोजन

एमपीसी न्यूज – गीता आश्रम, पुणे संस्थेने (Pune)मंगळवारी (दि.6) वार्षिक लक्षार्चना सोहळ्याचे आयोजन केले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लक्षार्चना हे समूहाने एकत्र होऊन केले जाणारे सर्वशक्तिमान (Pune)परमेश्वराच्या आराधनेचे एक दिव्यकर्म असून त्याच्या आचरणाने होणाऱ्या आध्यात्मिक लाभांसाठी सर्वदूर परिचित आहे. सुंदर पुष्परचना व रांगोळ्यांनी सजवलेल्या गीता आश्रमात सकाळी साडे सात वाजता लक्षार्चनेचा प्रारंभ झाला.

पवित्र मंत्रोच्चारणांच्या पारायणांनंतर सर्व उपस्थित भाविकांस प्रसाद वाटप झाले. गुरुदेवांच्या पूजन आणि दर्शनानंतर विशेष प्रसादाचाही लाभ भाविकांनी घेतला.

Junnar : आदिती तटकरे यांच्या हस्ते श्री क्षेत्र ओझर येथे बायोगॅस निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन

गुरुदेव श्री पद्मनाभन् कृष्णदासा ह्यांच्या काही जवळच्या अनुयायांनी गीता आश्रम ह्या आध्यात्मिक कार्यास समर्पित संस्थेची स्थापना 1998 साली खडकी, पुणे येथे केली. विशुद्ध अध्यात्माचा प्रसार व गुरुदेवांच्या “नर सेवा नारायण सेवा” ह्या तत्त्वावर आधारित निःस्वार्थ लोकसेवा ही संस्थेची उद्दिष्टे आहेत.


गीता आश्रम संस्थेकडून विविध आध्यात्मिक कार्यक्रम जसे की भजन, प्रवचने, वेगवेगळ्या पूजा-अर्चना व होमहवन, सणसमारंभ, योग/प्राणायाम ह्यांचे वर्ग, संस्कृत भाषेचे अध्यापन, आध्यात्मिक बाबींचे तसेच ज्योतिषविषयक मार्गदर्शन इत्यादी पूर्णपणे निःशुल्क चालवले जातात. गुरुदेवांचे सुबोध आध्यात्मिक साहित्य देखील संस्थेत उपलब्ध आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.