Alandi: प्रत्यक्ष अनुभवातून ऐतिहासिक,भौगोलिक,धार्मिक ठिकाणांची माहिती व्हावी यासाठी प्रशालेचे सहलीचे आयोजन

एमपीसी न्यूज -श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर मंदिर ही प्रशाला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच अग्रेसर असते.

 

निरीक्षणाची सवय व्हावी तसेच प्रत्यक्ष अनुभवातून ऐतिहासिक,भौगोलिक,धार्मिक ठिकाणांची माहिती व्हावी यासाठी प्रशालेने देहू, कार्ले ( एकविरा देवी),महड,उन्हेरे,पाली  येथे सन 2023 -24 या  वर्षातील शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते.सहलीत एकूण 120 विद्यार्थी सहभागी झाले होते.

Alandi : श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त आळंदीमध्ये उत्साहाचे वातावरण

श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सभासद अनिल वडगांवकर व इयत्ता तिसरीचे पालक श्री ज्ञानेश्वर कडू यांच्या हस्ते पालकांच्या उपस्थितीत  सहलींच्या गाड्यांचे पूजन होऊन  सहलीचा प्रारंभ झाला.या प्रसंगी अनिल वडगांवकर यांनी शालेय उपक्रमांचे कौतुक केले व ह .भ. प. रामेश्वर भोजणे यांनी सर्व पालकांच्या वतीने सहलीस शुभेच्छा व आशिर्वाद दिले .
प्रथम तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊनमंदिराची व तुकाराम महाराज यांची महती सांगण्यात आली.कार्ले येथील बौद्ध लेणी,एकवीरा देवी,महड गणपती,पाली गणपती, उन्हेरे येथील गरम पाण्याचे झरे नैसर्गिक चमत्कार विषयीची माहिती व तेथील आख्यायिका विद्यार्थ्यांना  सहलीतील शिक्षकांनी ज्ञात करून दिल्या.दोन्ही गणपती मंदिरात मुलांनी गणपतीची गाणी,स्तोत्र सादर केले. सर्वांनी  पाली येथे महाप्रसाद घेऊन सहलीची सांगता झाली.
 मुख्याध्यापक प्रदीप काळे  यांच्या मार्गदर्शनाखाली सहल प्रमुख निशा कांबळे यांनी जबाबदारी पार पाडली. वर्षा काळे,वैशाली शेळके,राहुल चव्हाण,शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.