Chinchwad : अजितदादांची पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना समज म्हणाले, यापुढे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोणतेही (Chinchwad)राजकीय नेते आले की सुरक्षेचे कारण देत पत्रकारांनी नेत्यांपर्यंत पोहूचू नये यासाठी पोलिसांचा प्रयत्न असतो.

पत्रकारांना नेत्यांपासून दूर ठेवण्याचा सतत प्रयत्न केला जातो. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करूनही पोलिसांमध्ये सुधारणा न झाल्याने पत्रकारांनी शहर दौऱ्यावर असलेले दुसरे उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली. त्यावर अजितदादांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना बोलावून घेत समज दिली.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडून शहरातील राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमां पासून पत्रकारांना दूर ठेवले जात होते. नेत्यांपर्यंत पत्रकारांना पोहचू दिले जात नव्हते.

साहित्य संमेलनासाठी काही दिवसापूर्वी पिंपरीत (Chinchwad)झालेल्या एका कार्यक्रमात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनयकुमार चौबे यांना सांगूनदेखील त्यांच्या इतर अधिकाऱ्यांनी आज पुन्हा एकदा पत्रकारांना नेत्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.

Chinchwad : झोपडपट्टी विरहीत पिंपरी-चिंचवड करण्याचे प्रयत्न – अजित पवार

यावेळी सर्व माध्यमांच्या पत्रकारांनी थेट अजित पवार यांना प्रश्न विचारत पोलिसांकडून पत्रकारांना का अडवलं जात आहे? अशी विचारणा केली. यावेळी अजित पवार यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना बोलवून घेतले आणि पत्रकारांसमोरच समज दिली. मुख्यमंत्री शिंदे असो, उपमुख्यमंत्री फडणवीस असो की मी आम्हाला झेड प्लस सुरक्षा असली तरी पत्रकारांना पोलिसांनी अडवायचे नाही.

ते त्यांचे काम करत असतात, त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे. त्यामुळे त्यांची अडवणूक पोलीस करू शकत नाहीत. पत्रकारांशी बोलायचे की नाही ते आम्ही नेते ठरवू  यापुढे पत्रकारांची तक्रार येता कामा नये, असं म्हणत चौबे यांची कानउघाडणी केली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.